छत्रपती संभाजी महाराजांचे नाव मुंबई-गोवा महामार्गाला द्या ; तरच जाईल कोकणवासीयांच्या मनातील सल... निलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

कोकणवासीयांच्या मनात आजही सल  दूर करण्यासाठी मुंबई- महामार्गाला छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नाव द्या..

रत्नागिरी : स्वराज्याचे दुसरे छत्रपती अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचे निर्माते छत्रपती संभाजीराजे यांना कोकणात फितुरीमुळे पकडण्यात आल्यामुळे कोकणवासीयांच्या मनात आजही सल कायम आहे, ती दूर करण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नाव द्यावे, अशी मागणी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

भाजपा नेते व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार निलेश राणे यांनी याबाबत एक ट्विट केले असून छत्रपती संभाजीराजे यांना कोकणात पकडले गेले. कोकणच्या मनातील ही सल दूर करण्यासाठी आणि त्यांना आदरांजलीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नामकरण व्हावे, असे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्ग मधिल जैतर यात्रेला यंदा भाविक मुकणार....

छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने संगमेश्वर येथील कसबा येथे पकडूम औरंगाबादला नेले होते. त्यांना पकडताना फितुरी झाल्याचा इतिहास आहे. संभाजी महाराज या शूरवीरास फितुरीमुळे पकडले जावे ही सल आज कोकनवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे नाव दिल्यास संभाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल,असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane Tweet demand rename mumbai goa high way as chatrpati sambhaji maharaj