esakal | सिंधुदुर्ग मधिल जैतीर यात्रेला यंदा भाविक मुकणार....
sakal

बोलून बातमी शोधा

sindhdhurg jaitir festival stoped

२२ मे रोजी होणारा कोकणातील सुप्रसिद्ध जैतीर उत्सव रद्द...

सिंधुदुर्ग मधिल जैतीर यात्रेला यंदा भाविक मुकणार....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे यावर्षी दि.२२ मे रोजी होणारा कोकणातील सुप्रसिद्ध जैतीर उत्सव शासन व प्रशासनाच्या नियमांशी अधीन राहून रद्द करण्याचा निर्णय तुळस देवस्थानचे मानकरी व देवस्थान समिती यांनी घेतला आहे.

तुळसचे ग्रामदैवत नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेला श्री.देव जैतीराचा उत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. सलग ११ दिवस चालणा-या या उत्सवास जिल्ह्यासहित मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी व नजीकच्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते.

हेही वाचा- स्थानिकांना लाॅकडाऊनमध्येही आहेत रोजगाराच्या लाखो संधी पण...


मात्र शासकीय यंत्रणेने मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने (गर्दीत ) हा उत्सव साजरा करण्यास पायबंद घातलेला आहे. व तशा सुचनाही संबंधितांना मानकरी व देवस्थान कमिटीला दिलेल्या आहेत. तुळस गावात वर्षातून  ११  दिवस श्री देव जैतिर अवसारी नागरिकांच्या भेटीला येतो. यामुळे तुळस गावसाहित पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. तथापी शासनाच्या व प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासंबंधी जनजागृतीच्यादृष्टीने मानकरी व समिती सदस्य तुळस गावात घरोघरी फिरुन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत.