निलेश राणेंनी संजय राऊतांना दिले हे आव्हान

तुषार सावंत
Monday, 17 August 2020

खासदार संजय राऊत यांना उद्देशून तुम्ही निवडणूक तरी लढवून दाखवा असे उघड आव्हान दिल्याने राजकीय गोठात खळबळ उडाली आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) :  देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात कोणत्याही घडामोडी घडल्या तरी भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे आणि त्यांचे  दोन्ही पुत्र यांनी राऊत बंधूना टार्गेट केले आहे.  दिल्लीच्या राजकारणावरून माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांना केंद्र सरकार विरोधातील वक्तव्यावरून चांगले कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी एका टि्वट द्वारे खासदार संजय राऊत यांना उद्देशून तुम्ही निवडणूक तरी लढवून दाखवा असे उघड आव्हान दिल्याने राजकीय गोठात खळबळ उडाली आहे.

 नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये उडी घेतल्यानंतर तर राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश राणे हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद उफाळून आला आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. यामुळे राणेंनी जे  उद्दिष्ट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याला हरताळ फासला गेला आणि राणेंच्या कुंटूंबाच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून आजवर महा विकास आघाडीचे सरकार औट घटकेचे आहे.

 

हेही वाचा- दहा दिवसांत तेरेखोलचा पुन्हा रूद्रावतार, जाणून घ्या बांद्याची स्थिती -

गणपतीनंतर या सरकारचे विसर्जन होईल अशी अनेक वक्तव्य राणेंने केली आहेत. अशा वक्तव्यावर महाविकास आघाडीकडून फारशी दखल घेतली जात नाही. पण सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेना पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची संधी साधली. यावर खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या भावाच्या आणि कणकवली परिसरातील खुण्याच्या घटनांची उच्चस्थरिय चौकशीची लेखी मागणी राज्य सरकारकडे केली.

हेही वाचा- माजी खासदार नीलेश राणे यांना कोरोनाची लागण : संपर्कातील व्यक्तीना स्वॅब टेस्ट करण्याचे केले आवाहन -

यावेळी पुन्हा एकदा राणे विरूध्द राऊत असा वाद सुरू झाला होता. हा वाद शांत होताच  माजी खासदार निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांना टार्गेट करण्याची संधी साधली आहे.  संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते असल्याने ते आपली मते वारंवार मांडत असतात. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवक्ते मंडळी फारशी पुढे आली नाही. पण माजी खासदार निलेश राणे हे आघाडीवर असून माध्यमांसमोर किंवा ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी राऊत यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane tweet sanjay raut commented Rane target is Raut brothers