मोदी देशाचे, तर मी देवगडचा चौकीदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

देवगड - नाणार प्रकल्प विरोधी भूमिका खंबीरपणे आपण शासनाला पटवून देऊ शकलो म्हणून प्रकल्प रद्दची घोषणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर देशाचे चौकीदार असतील तर मी देवगडचा चौकीदार आहे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले.

नाणार प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना शासनाने जाहीर करताच त्या विरोधात लढा देणाऱ्या आमदार नीतेश राणे यांचा पडेल कॅिन्टन येथील विजयी मेळाव्यात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे, तालुकाध्यक्ष अमोल तेली, युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, जिल्हा बॅंक संचालक ॲड. अविनाश माणगावकर, जनार्दन तेली, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, ‘‘देशातला मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प रद्द केल्याचे समाधान आपल्याला आहे. युती शासनावर माझा विश्वास नाही. त्यामुळे प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना नक्की निघाली आहे का याची खात्री केली. प्रकल्पामुळे येथील शेती, मत्स्य व्यवसाय अडचणीत आला असता. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करून तो रद्द करण्याची आपली मागणी होती. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात प्रकल्पाविरोधात ठराव दिले होते. रोजगाराच्या आड राहून प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांचा हेतू साध्य करायला देणार नाही. यापुढेही आपली विरोधी भूमिका कायम राहील.’’ सूत्रसंचालन प्रमोद नलावडे यांनी केले.

सहकार्य करणाऱ्यांचे मानले आभार
नाणार प्रकल्प विरोधी लढ्यात आपल्याला सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करणाऱ्यांसाठी हा विजयी मेळावा असल्याचेही आमदार राणे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane comment