जनतेसाठी काहीतरी करुन दाखवा; आठवलेंची राज्यसरकावर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेसाठी काहीतरी करुन दाखवा; आठवलेंची राज्यसरकावर टीका

जनतेसाठी काहीतरी करुन दाखवा; आठवलेंची राज्यसरकावर टीका

रत्नागिरी : महाविकास आघाडीने केंद्राकडे जबाबदारी सोपवण्यापेक्षा स्वतः पुढे होऊन काहीतरी केले पाहीजे. प्रत्येक गोष्ट केंद्रावर सोपवून चालणार नाही. केंद्राने हे केले, ते केले नाही म्हणत बसण्यापेक्षा जनतेसाठी काहीतरी करुन दाखवा, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तौक्ते चक्रीवादळामुळ मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभुमीवर ते कोकण दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर, गोठ्यांसह शाळा, सार्वजनिक इमारतींचे पत्रे उडून गेले आहेत. आंब्याचे नुकसान सर्वाधिक झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. काजूच्या बागांना मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. प्रशासन योग्य पध्दतीने काम करत आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत मिळण्यासाठी प्रधानमंत्र्यांना दोन दिवसांत पत्र लिहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित भागांचा दौरा करुन माहिती घेतली आहे. बाधितांना मदत देण्यासाठी केंद्राने वाटा उचलावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडशी आलेला घास गेला. मच्छीमारांच्या अनेक बोटींचे नुकसान झाले आहे. मागील वेळेपेक्षा हे नुकसान कमी आहे; परंतु कोरोनाच्या परिस्थितीत बोटींवरील मच्छीमारांना मदत वेळेत मिळाली पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: आता तारीख नाही लवकरच 'चिपी' सुरु: मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोरोना आपत्ती मागील सव्वा वर्षापासून थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दुसर्‍या लाटेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर लसीकरणाचा पर्याय आहे. राज्य शासनाने स्वतःहून पुढाकार घेतला पाहीजे. केंद्राकडे जबाबदारी सोपवण्यापेक्षा महाविकास आघाडीने महाराष्ट्रात काहीतरी केले पाहीजे. प्रत्येक गोष्ट केंद्रावर सोपवून चालणार नाही. सतत वक्तव्य करत राहण्यापेक्षा राज्यातील लोकांसाठी मदतीचे प्रयत्न करा. जनतेसाठी काहीतरी करुन दाखवा असा टोला रामदास आठवले यांनी हाणला.

महाराष्ट्राला सर्वात जास्त लस मिळाली असून देशात एक नंबर आहे असे राज्यातील मंत्री सांगत आहेत. तसे असेल तर लस आली कुठून? ती केंद्रानेच दिली ना? केंद्र सरकार मुद्दाम कोणावर अन्याय करते असे नाही. रुग्ण संख्या सव्वाचार लाखापर्यंत पोचली आहे. केंद्राला व राज्याला नियोजन करता आले नाही. लोकांचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाला. या परिस्थितीत राज्याने प्रत्येक गोष्ट केंद्रावर न टाकता आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहीजे.

हेही वाचा: हापूस आंब्याला नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास

आंबा, मच्छीमारांना स्वतंत्र पॅकेज द्या

आंबा, मच्छीमारांसाठी विशेष पॅकेज मिळाले पाहीजे. त्यांचा व्यावसाय पूर्णतः बंद झाला आहे. त्यांना मदत मिळालीच पाहीजे. विमा असेल तर त्या माध्यमातून मदत कशी मिळेल हे पाहायला हवे. यात केंद्र व राज्य दोघांनीही मदत करावी आणि सामान्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पाहीजे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

loading image
go to top