'ठाकरे सरकार पडणार ही अफवा असेल तर...'

काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णयही घेऊ शकते; राजकीय वर्तुळात चर्चा
'ठाकरे सरकार पडणार ही अफवा असेल तर...'

सिंधुदुर्ग : पदोन्नतीमधील आरक्षण ((reservation in promotion) रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीवर काँग्रेस (demand of congress) ठाम आहे. हे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे. काहीही झाले तरी हा अध्यादेश रद्द करावा अशी कॉंग्रेसची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (mahavikas aghadi and shivsena) शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसने मागणी मान्य केली नाही, तर प्रसंगी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णयही घेऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरून महाविकास आघाडी सरकावर टिका सुरु आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठवली आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट मधून म्हटंले आहे, महाविकास आघाडी सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर...राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात ५ तास बसून कशासाठी महायज्ञ करत आहेत? राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी! अशी खोचक टिका त्यांनी केली आहे.

काँग्रेसने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना, अजित पवार यांना लक्ष्य करण्याचे टाळले. अध्यादेश रद्द करावा ही आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे. अजित पवार (ajit pawar) किंवा त्या उपसमितीने हा निर्णय घेतलेला नाही. हा कॅबिनेटचा निर्णय नाही. अशी सारवासारव सुद्धा नाना पटोले यांनी केली. पण अजित पवार अध्यक्ष असलेल्या उपसमितीने हा निर्णय घेतलाच कसा? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

'ठाकरे सरकार पडणार ही अफवा असेल तर...'
Photo Story: निसर्गाच्या कुशीत वसलेले कासवांचे गाव ' वेळास '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com