Nitesh Rane: राणेंना जामीन देताना कोर्टाने घातल्या 'या' अटी

कोल्हापुरात सीपीआर रुग्णालया बाहेर जल्लोष केला.
Nitesh Rane Santosh Parab Case Goa connection
Nitesh Rane Santosh Parab Case Goa connectionsakal
Updated on

सिंधुदुर्ग: शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab ) हल्ला प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी नितेश राणेंना जामीन मंजूर केला. तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर झाला आहे. नितेश राणेंना जामीन मंजूर होताच राणे समर्थकांनी कोल्हापुरात (Kolhapur) सीपीआर रुग्णालया बाहेर जल्लोष केला. निलेश राणे यांनी सत्याचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली. नितेश राणेंना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्याची माहिती वकील संग्राम देसाई (Sangram Desai) यांनी दिली. नेमक्या कोणत्या अटीवर राणेंना जामीन मंजूर झाला जाणून घेऊया. (Nitesh Rane latest Marathi News)

नितेश राणे यांचा जामीन अर्ज मंजूर झाला असला तरी त्यांची तब्येत अद्याप सुधारलेली नाही. कोल्हापुरात त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरु आहेत. आज सायंकाळी राणेंच्यावर अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती सीपीआरच्या प्रशासनाने दिली. चार वैद्यकीय अधिका-यांच्या उपस्थित राणेंवर अँजिओग्राफी केली जाईल. दरम्यान राणे यांनी चार तासापासून कोणतही अन्न खालेलं नाही. जामीन मिळाल्यामुळे नितेश राणे (Nitesh Rane)अँजिओग्राफी करून घ्यायला तयार होणार की नाही याकडं कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Nitesh Rane Santosh Parab Case Goa connection
जामीनानंतर राणे कुटुंबियांकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'ही वेळ...'

नितेश राणेंना या अटी घालण्यात आल्या

न्यायालयाने नितेश राणे यांना कणकवली (Kankavli) तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात.

जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत.

आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरस पोलिस स्टेशनला हजर राहावे लागेल.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी नितेश राणेंना जामीन मंजूर केला आहे. ४ फेब्रुवारीला राणेंनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी ८ रोजी पूर्ण झाली होती. अखेर न्यायालयाने निर्णय दिला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर राणेंना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार होते. मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने कोल्हापुरला हालण्यात आले होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, मंत्री नारायण राणे दिल्लीतील संसदीय अधिवेशनातून थेट सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com