''आज परत सांगतो.. पार्थ लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा.'' 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इमॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे." 

सिंधुदुर्ग - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यात अजून भर पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इमॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे." 

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायन राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राणे यांच्या या ट्विटमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ''आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पार्थ पवार यांनी राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून 'जय श्रीराम'चा जयघोष करणारे ट्वीट केले होते. शिवाय सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडून व्हावा अशी मागणीही पार्थ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली होती. त्याबातचे निदेन त्यांनी मंत्री देशमुख यांना दिले होते. 

हे पण वाचा एकेकाळी या गावात होता दुष्काळ, पण आज प्रत्येकाच्या घरासमोर आहे रुबाबदार बुलेट 

दरम्यान, शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतेही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचे नाही, असे पार्थ पवार यांनी सांगितले आहे.

 

आज परत सांगतो..

पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!!

थांबू नकोस मित्रा !!

— nitesh rane (@NiteshNRane) August 12, 2020

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitesh rane tweet on parth pawar