esakal | महाराष्ट्रवासीयांना आजपासून गोव्यात नो एंट्री....
sakal

बोलून बातमी शोधा

No entry to Goa for Maharashtra residents kokan marathi news

 सीमेपासून शंभर मीटर अंतरावर  दोन पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व इतर अत्यावश्यक सेवांसाठी गोव्यात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची वेगळी नोंद ठेवा अशी स्पष्ट सूचना गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना केली आहे.

महाराष्ट्रवासीयांना आजपासून गोव्यात नो एंट्री....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) :कोरोनामुक्तीच्या पार्श्वभूमीवर  गोव्याने आपली सुरक्षा वाढवली आहे. दोडामार्गमधून साळला (गोवा) जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आजपासून  तपासणी नाका उभारला. महाराष्ट्रातील सर्वांना आजपासून  संपूर्ण गोवा बंदी केली आहे.
 सीमेपासून शंभर मीटर अंतरावर  दोन पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व इतर अत्यावश्यक सेवांसाठी गोव्यात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची वेगळी नोंद ठेवा अशी स्पष्ट सूचना गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना केली आहे.


गोवा राज्य संपूर्ण कोरोना मुक्त झालेले असून आपल्या सुरक्षिततेचे वेगवेगळे उपाय  गोवा शासन करत आहे .खबरदारी म्हणून दोडामार्ग मार्गे साळ,खोलपेवाडी, अस्नोडा, धारगळ, पेडणे आदी ठिकाणी अनेकजण अत्यावश्यक कामासाठी गोव्यात ये-जा करतात ; मात्र यातील किती लोक परत येतात याची नोंद शासनाकडे नसते .म्हणूनच दोडामार्ग खोलपेवाडी साळ या मार्गावर खोलपेवाडी येथील तिलारी जलसंपदा विभागाच्या (गोवा) कार्यालयाजवळ गोवा पोलिसांनी नवीन तपासणी नाका उभारला आहे.

हेही वाचा- आदि मारलं कोरोनान आता मारलं वादळान ; सांगा आम्ही करायचं तरी काय ?

त्याला स्थानिकांनी विरोध केल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ,सभापती राजेश पाटणेकर तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी गुरुदास गावडे ,पोलिस निरीक्षक संजय दळवी व साळचे सरपंच घनश्याम राऊत यांनी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली व अत्यावश्यक सेवेसाठी लगतच्या वाडीतील लोकांना ओळखपत्र दाखवल्यास ह्या चेकनाक्यावरून जाण्यासाठी परवानगी देण्याचा आदेश  मुख्यमंत्र्यांनी दिला.

हेही वाचा- वैभव मांगले सध्या करतात तरी काय.... . वाचा.
याचवेळी  गोव्याचे  पोलीस अधिकारी श्री.गावडे यांनी महाराष्ट्र पोलिसांशी चर्चाही केली. गोव्यात आवश्यक सेवेसाठी जाणाऱ्या नागरिकांची योग्य नोंद ठेवा, एखादा नागरिक गोव्यातून त्याच दिवशी महाराष्ट्रात न परतल्यास त्याबद्दल गोवा पोलिसांना कळवा असे सांगितले तसेच दोडामार्ग लगत गोवा क्षेत्रात असणाऱ्या पेट्रोल पंपवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या लोकांची नोंद  ठेवून ते परत येतात की नाही यावरही विशेष लक्ष केंद्रित करा असेही त्यांनी दोडामार्ग पोलिस उपनिरीक्षक सुनील बागल यांना सांगितले .

 

loading image