जिल्हावासीयांना दिलासा, 43 अहवाल निगेटिव्ह, दिवसभरात एकही नवा बाधित नाही..

no more corona patient in ratnagiri
no more corona patient in ratnagiri

रत्नागिरी : जिल्हावासीयांना काहीसा दिलासा देणारी बाब पुढे आली आहे. आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळेला नाही. सर्वच्या सर्व 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची वाढती संख्या आज 343 वरच थांबली आहे. दुसरी समाधानाची बाब म्हणजे आज एका दिवसभरात 30 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.


जिल्ह्यात आज प्राप्त झालेले 43 अहवाल निगेटिव्ह आले असून, आज एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. दिवसभरात 30 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 159 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 343 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 171 आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 744 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 372 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत.

त्यातील 343 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित 6 हजार 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 372 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 372 प्रलंबित अहवालामध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 368 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत एकूण 1 लाख 20 हजार 83 व्यक्ती दाखल आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या 48 हजार 830 आहे.


होम क्वारंटाईनची संख्या 62 हजार

जिल्ह्यात सध्या 116 ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत तर संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये 71 संशयित रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यातील होम क्वारंटाईनखाली असणार्‍यांची संख्या 62 हजार 588 इतकी आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com