रत्नागिरीकरांना दिलासा; Lockdown बाबत मंत्री सामंतांचे वक्तव्य

चाचण्या वाढवल्यास विदर्भप्रमाणेच तो दर खाली येईल
रत्नागिरीकरांना दिलासा; Lockdown बाबत मंत्री सामंतांचे वक्तव्य

रत्नागिरी : चाचण्या वाढवल्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट (positivity rate) 8.65 टक्क्यांनी कमी झाला आहे. जिल्हावासीयांसाठी (ratnagiri district) ही खुशखबर आहे. पुढील काही दिवसांत १० हजारापर्यंत चाचण्या केल्यास आलेख ५ टक्क्यांवर येईल. त्यामुळे जिल्ह्यात टाळेबंदीची (ratnagiri lockdown) (लॉकडाऊनची) आवश्यकता भासणार नाही, असे दिलासादायक वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत (uday samant) यांनी केले.

झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गेले चार दिवस जिल्ह्यातील चाचण्या वाढवण्यात आल्याने कोरोनाची स्थिती समाधानकारक झाली आहे. काल (16) झालेल्या सात हजार चाचण्यात 603 बाधित सापडले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी दर 8.61 टक्के वर आला. 1 जुननंतर प्रथमच १० टक्केपेक्षा दर कमी झाला. काही दिवसांपुर्वी तो 15.7 टक्के होता. चाचण्या वाढवल्यास विदर्भप्रमाणेच तो खाली येईल.

रत्नागिरीकरांना दिलासा; Lockdown बाबत मंत्री सामंतांचे वक्तव्य
खुशखबर! फळप्रक्रिया उद्योगांसाठी केंद्राची नवी योजना

मे महिन्यात तो 27 टक्केपर्यंत पोचला होता. सध्या कमी झालेला दर हा रत्नागिरीकरांसाठी शुभसंकेत आहेत. मागील पंधरा दिवसांची सरासरी पाहिल्यास हा दर 12.07 टक्के आहे. चाचण्या वाढविण्याविषयी एक महिन्यापुर्वी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना केली होती; परंतु कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांची अंमलबजावणी केली हे माहीती नाही. सध्या जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटी रेट कमी असल्यामुळे टाळेबंदीची आवश्यकता नाही. हा निर्णय घेतेवेळी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्यावे लागेल, असे मंत्री सामंत यांनी ठामपणे सांगितले. सध्या लोकांच्या मनातील दडपण कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

चार तज्ज्ञ डॉक्टर रत्नागिरीत

कोरोना (covid-19) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणून खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांच्या प्रयत्नामुळे चार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. रत्नागिरीत डॉ. आकाश परब, डॉ. अमर चव्हाण, डॉ. विवेक वाघेला, डॉ. सुहास सेजल यांचा सहभाग आहे. पंधरा दिवस जिल्ह्यात थांबून बाधितांचा दर कमी आणण्यासाठी ते आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करतील. या पथकाने पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी काम केले आहे. जिल्ह्यातील लसीकरण मोहीमही चांगल्या पध्दतीने सुरु आहे. आतापर्यंत 3 लाख 49 हजार 971 जणांचे लसीकरण झाले. त्यातील 1 डोस 2 लाख 75 हजार 859 जणांनी पहिला तर 74 हजार 112 जणांनी दुसरा डोस घेतला.

रत्नागिरीकरांना दिलासा; Lockdown बाबत मंत्री सामंतांचे वक्तव्य
देशात 10 ठिकाणी मिळणार स्पुटनिक-V लस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com