Teacher organisations have demanded full-time exemption from SIR duties to prevent academic loss for students.
Sakal
पाली : सध्या देशामध्ये १९ राज्यांत एसआयआर विशेष सखोल पुनरीक्षण २०२६) अंतर्गत बीएलओ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या राष्ट्रीय कामाच्या नावाखाली केवळ शिक्षकांनाच वेठीस धरले जात असल्याने शिक्षक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'राष्ट्रीय काम फक्त शिक्षकांनीच करायचे का? इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना यातून सूट का?' असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि वाढत्या ताणामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप. याबाबत सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष मोरेश्वर कांबळे यांनी प्रशासनावर घणाघाती टीका केली आहे.