esakal | तनिष्कतर्फे दागिने खरेदीवर ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

kudal

तनिष्कतर्फे दागिने खरेदीवर ऑफर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : टाटा समूहातील ज्वेलरी ब्रँड तनिष्कने दागिन्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या ऑफरची घोषणा केली आहे. या सेलमध्ये तनिष्ककडून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर २५ टक्केपर्यंतची व सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसवर २५ टक्केपर्यंत सूट दिली जाईल. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

सोने, हिरे, सॉलिटेअर व प्लॅटिनम दागिन्यांच्या सर्वोत्तम डिझाईन्सची तनिष्कची सर्वांत मोठी श्रेणी या ऑफर्समुळे आता अधिकच आकर्षक बनणार आहे.हल्लीच तनिष्कने आपले नवीन कलेक्शन ‘आरंभ’ सादर केले आहे. नाजूक, सुबक आणि अतिशय कुशल नक्षीकामाने सजवलेली आधुनिक डिझाईन्स हे वैशिष्ट्य असलेले ‘आरंभ’ कलेक्शन मानवी संबंधांमधील एकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाप आहे. या ऑफर्सबद्दल ज्वेलरी डिव्हिजनच्या जनरल मॅनेजर - मार्केटिंग श्रीमती रंजनी कृष्णस्वामी यांनी सांगितले की, दागिने खरेदी हाच मुळात एक उत्सव असतो.

कितीतरी वेगवेगळ्या भावभावना, नाती, आठवणी, आयुष्यातील टप्पे आणि दागिने खरेदी यांचे घनिष्ठ नाते असते. प्रेम, ममता आणि वचनबद्धतेचे प्रतीक बनण्यापासून नव्या, पवित्र आरंभाचा साक्षीदार होण्यापर्यंत आणि कितीतरी सण, समारंभ, लग्न यांचा आनंद द्विगुणित करण्यापर्यंत अनेक बाबतीत सोन्याचे दागिने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावत असतात.

हेही वाचा: शिवसेनेची संघटनात्मक बांधणी हे आव्हान

आमच्या ग्राहकांना सर्वांत चांगल्या ऑफर्स दिल्या जाव्यात जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनातील सुंदर क्षणांचा भरभरून आनंद घेता येईल आणि तनिष्कसोबत तो आनंद संस्मरणीय बनवता येईल. आमच्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच तनिष्कचा खास अनुभव प्रदान करावा अशी आमची इच्छा आहे. अधिक माहितीसाठी तनिष्क कुडाळ संत राऊळ महाराज कॉलेज रोड, कुडाळ पोलिस स्टेशननजीक येथे संपर्क साधावा.

तनिष्कच्या उत्कृष्टतेसाठीच्या वचनबद्धतेचा सन्मान म्हणून ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडवायजरीने २०१९ मध्ये भारताचा ‘द मोस्ट ट्रस्टेड ज्वेलरी ब्रँड’ हा किताब तनिष्कला बहाल केला. अतिशय शुद्ध दागिने देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे पालन करत तनिष्कने आपल्या सर्व स्टोअर्समध्ये कॅरेट मीटर उपलब्ध करवून दिले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना सोन्याची शुद्धता पारखण्याचा सर्वाधिक कुशल व सर्वांत योग्य मार्ग उपलब्ध झाला आहे. तनिष्कमध्ये ५००० हून अधिक पारंपरिक, पाश्‍चात्य व फ्युजन लूकचे सोने व जेम-सेट दागिने (२२ व १८ कॅरेट सोन्याचे) आहेत. येथील सर्व दागिने सर्वसमावेशक उत्पादन प्रणालीमध्ये अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने बनवले जातात. तनिष्कच्या रिटेल शृंखलेत आता २५० पेक्षा जास्त शहरांमध्ये ४०० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव बुटिक्स आहेत, असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top