गुहागरात चार ठिकाणी समुद्रावर तेलाचा तवंग

गुहागरात चार ठिकाणी समुद्रावर तेलाचा तवंग
Updated on

गुहागर (रत्नागिरी) : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर (Guhagar beach) चार भागांत तेलाचा तवंग (Oil waves) आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र, आजतागायत या तवंगाबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) कार्यवाही केलेली नाही. काल प्रदूषण मंडळाचे अधिकारी अजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘आमच्याकडे याबाबत तक्रार आलेली नाही. तवंगाचे काही नमुने तपासासाठी न्यावे लागतील. त्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरेल.’ (oil-waves-at-four-places-in-guhagar-beach-kokan-ratnagiri-marathi-news)

बाजारपेठ ते वरचापाट मोहल्ला या परिसरात चार ठिकाणी तेलाचा तवंग असलेल्या लाटा दिसतात. आठ दिवसांपूर्वी केवळ वरचापाट परिसरातील एकाच भागात या लाटा दिसत होत्या. यावेळी तेलाच्या तवंगाचे प्रमाणही जास्त आहे. याबाबत तहसीलदार लता धोत्रे म्हणाल्या की, ‘स्थानिकांकडून या विषयाची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर प्रदूषण मंडळाला या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.’

चव्हाण म्हणाले, ‘आठ दिवसांपूर्वी एकदा याबाबत चर्चा ऐकली होती. हा तवंग कशामुळे येतो, याची माहिती घेतली पाहिजे. मागे तवंग आला तेव्हा आम्ही चौकशी केली. त्यावेळी आरजीपीपीएल व्यवस्थापनाला कळवले होते. मात्र, कोणतीच तक्रार न आल्याने हा विषय थांबला. आता पुन्हा तवंग येत असल्याने वरिष्ठांशी याविषयी बोललो आहे.’

तपासणी अहवालातून हा तवंग ऑईल, ग्रीस किंवा अन्य कोणता आहे ते समजेल. त्यानंतर तो कोठून आला याचीही माहिती घ्यावी लागेल. जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर असा तवंग आढळत आहे का, याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. त्यानंतरच काय कार्यवाही करायची हे ठरवता येईल.

- अजय चव्हाण, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Driver’s Presence of Mind Prevents Disaster as ST Bus Nearly Overturns in Pali
Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Marathi News Esakal
www.esakal.com