आेल माॅथ पतंग होतोय दुर्मिळ 

आेल माॅथ पतंग होतोय दुर्मिळ 

रत्नागिरी - फुलपाखरे त्याचबरोबर पतंगाच कुतूहल प्रत्येकालाच असते. असेच एक दुर्मिळ होत असलेले ओल माॅथ जातीचे पतंग खेड - रत्नागिरी रेल्वे प्रवासादरम्यान आढळले.

प्रामुख्याने सह्याद्रीच्या परिसरात या पतंगाचे वास्तव्य पहायला मिळते. घुबडासारखे डोळे त्याच्या पंखावर असतात. हा पतंग ओल माॅथ या नावाने आेळखला जातो. या पंतंगाच्या पंखावर डोळ्यासारख चित्र असल्याने किटकांपासून त्याचं संरक्षण होते. निसर्गाने त्याला संरक्षणसाठी दिलेलं हे एक वरदान आहे.

श्रावणातील वातावरण या फुलपाखरांसाठी पोषक असते. यावेळी ही फुलपाखरं कोषातून बाहेर पडतात. यासाठी जवळपास 12 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. ऐन, लिंबू, किंजळ यासारख्या झाडांवर या पतंगाची उपजीविका असल्याने ती या झाडांवर आढळतात. एक माॅथ 200 ते 300 अंडी घालतो. या पंतगाचा जीवनक्रम ज्या झाडावर अंडी घालतात त्याच झाडावर असतो. 4 ते 8  दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर येतात. त्या आल्यानंतर त्याची पाच प्रकारात वाढ होते. त्याची वाढ होण्यात एक ते दिड महीन्यांचा कालावधी लागतो आणि पुन्हा 3 ते 6 आठवडे कोष बांधायला लागतात. कोष 8 ते 16 तासांत बांधून पुर्ण करतात. 3 ते 6 आठवडे त्यांची सुप्ता अवस्थेत जातात. या पतंगाचा जीवनकाल साधारण 54 ते 60 दिवसांचा असतो.

यापुर्वी या पतंगांची संख्या सह्याद्री परिसरात खुप पहायला मिळायची, मात्र हे पतंग दुर्मिळ होत चाललय. जंगलांना लागलेले वणवे यामुळे फुलपाखरं आणि पतंग यांच्या अनेक  प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

- धनंजय मराठे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com