ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी उशिरा: प्रतिकूल वातावरण; गेल्यावर्षीची पुनरावृत्ती

अनुभवायला मिळतो जन्मानंतरचा सुखद समुद्रप्रवास
ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी उशिरा: प्रतिकूल वातावरण; गेल्यावर्षीची पुनरावृत्ती

राजापूर, ता. १३ ः अवकाळी पाऊस, वादळ आदींमुळे वातावरणामध्ये कमालीचा बदल झाल्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये समुद्र कासवाची प्रजाती ऑलिव्ह रिडले कासवाचे समुद्र किनाऱ्‍यावर अंडी घालण्यासाठी होणाऱ्‍या आगमनाची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

प्रतिकूल वातावरणामुळे गतवर्षी कासवाचे अंडी घालण्यासाठी किनाऱ्‍यावरील आगमन उशिरा झाले होते. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रतिकूल वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही कासवांचे समुद्रकिनाऱ्‍यावरील आगमन उशिरा होणार की ठरलेल्या वेळेनुसार होणार ? याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागातील सागरी किनारपट्टीवर आढळणार ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव वा त्याची अंडी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर आढळली नव्हती. मात्र, गेल्या पाच वषर्शंपासून तालुक्यातील माडबनच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालण्यासाठी साधारण डिसेंबर महिन्यामध्ये येत असल्याचे आढळून आले. किनाऱ्‍यावरील वाळूमध्ये कासवाच्या मादीने घातलेल्या अंड्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून स्थानिक ग्रामस्थांसह वनविभागाने उपाययोजनाही वेळोवेळी केल्या आहेत.

त्यातून अंड्यामधून बाहेर पडलेल्या इवल्याशा कासवांच्या पिल्लांचा जन्मानंतरच्या सुखद समुद्रप्रवास माडबनवासियांना अनुभवला आहे.

कासवाच्या आगमनाची उत्सुकता

अवकाळी पाऊस आणि वादळस्थितीमुळे प्रतिकूल स्थिती राहिल्याने गतवर्षी समुद्र कासवांचे समुद्र किनाऱ्‍यावर उशीरा आगमन झाले होते. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थिती कायम आहे. त्यामुळे प्रतिकूल स्थितीमुळे निसर्गप्रेमींना कासवाच्या आगमनाची उत्सुकता आहे. स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे ऑलिव्ह रिडले प्रजातीचा कासवाची मादी दरवर्षीच्या कालावधीप्रमाणे अंडी घालण्यासाठी किनारपट्टीवर येणार की गतवर्षीप्रमाणे त्यांचे आगमन लांबणीवर पडणार? याकडे लक्ष लागले आहे.

अशी केली जाते जागेची निवड

ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. सर्वसाधरणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. या कालावधीमध्ये मादी कासव वालुकामय भागात हायटाईड लेव्हलपासून सुमारे ५० ते १०० मीटर अंतरावर १ ते १५ फूट खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com