सॅटेलाइट टॅगिंग केलेली चार ऑलिव्ह रिडले कासवांपैकी दोन सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ आहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅटेलाइट टॅगिंग

सॅटेलाइट टॅगिंग केलेली चार ऑलिव्ह रिडले कासवांपैकी दोन सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ आहेत

रत्नागिरी : सॅटेलाइट टॅगिंग केलेली चार ऑलिव्ह रिडले कासवांपैकी दोन सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ आहेत, तर सावनी आणि रेवा ही दक्षिणेकडे कर्नाटक किनारपट्टीवर सध्या ती संलग्न क्षेत्रातच असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यामध्ये खाद्य मिळणाऱ्या भागात ही कासवं विशिष्ट प्रदेशात वास्तव्य करून राहत असावीत, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यातील तीन महिन्यांतील त्यांचा प्रवास पाहणे रंजक ठरणार आहे.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. ही कासवं एका किनाऱ्यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो यावर अजूनपर्यंत अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनार्‍यांचा पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आली. गेल्या पाच महिन्यात त्यांच्या पाचपैकी चार कासवांवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. प्रथमा आणि वनश्री सध्या सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून जवळच स्थिरावलेली आहेत. प्रथमा दीवच्या किनाऱ्यावरून गुजरातच्या पाण्यात गेली होती; पण नंतर ती दक्षिणेकडे वळली आणि पुन्हा महाराष्ट्राच्या पाण्यात शिरली.

सध्या ती सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर सापडली. वनश्री हळूहळू दक्षिणेकडे सरकत असून ते सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आहे. रेवाने जवळजवळ दक्षिण कर्नाटकच्या पाण्यापर्यंत प्रवास केला होता; परंतु आता ती उत्तरेकडे वळली आहे आणि ती अजूनही कर्नाटकच्या किनार्‍यावरील समुद्राच्या पाण्यात आढळू शकते. सावनीने दक्षिणेकडे प्रवास सुरू ठेवला असून, सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीच्या समुद्राच्या पाण्यात आढळू शकते. ही कासवे गेल्या आठवडाभरात फारशी हलली नाहीत आणि सध्या ते संलग्न क्षेत्र असलेल्या प्रदेशात ते वास्तव्याला आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाळा सुरू होत आहे. या कालावधीत ही कासवे प्रवास करतात किंवा नाही हे पाहणे निरीक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

वास्तव्य याच परिसरात शक्य

पावसाळा सुरू होण्याचे संकेत मिळाल्यानंतर समुद्रातील प्रवाह बदलू लागतात. त्या प्रवाहांबरोबर कासवांचा प्रवासही एकाच दिशेने होतो, असा अंदाज अभ्यासकांकडून बांधला जात आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात कासवं आहेत त्याच भागात स्थिर राहिली असावी, असा अंदाज आहे. सध्या तरीही पाऊस जाईपर्यंत ती याच भागात राहण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात...

पाच महिन्यांतील चार कासवांचा आढावा

पावसाळ्यातील प्रवास रंजक

सावनी आणि रेवा कर्नाटक किनारपट्टीवर

Web Title: Olive Ridley Turtles Satellite Tagging Sindhudurg Coast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top