
Omkar Elephant/ ओंकार हत्ती
esakal
हायलाइट समरी पॉइंट्स
ओंकार हत्तीची दहशत – मडुरा-सातोसे-रेखवाडी परिसरात ‘ओंकार’ हत्ती चार दिवसांपासून थांबला असून, भातशेती, केळी व अन्य पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
रस्ता ठप्प व ग्रामस्थांचा आक्रोश – काळा आंबा येथे तासभर हत्ती रस्त्यावर उभा राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांनी वनविभागाला घेराव घालत ठोस कारवाईची मागणी केली.
ठोस निर्णयाची मागणी – शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, जीवितालाही धोका असल्याने ग्रामस्थांनी इशारा दिला की तातडीने बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
Omkar Elephant Sindhudurg : मडुरा-सातोसे रेखवाडी भागात ‘ओंकार’ हत्ती चार दिवसांपासून तळ ठोकून आहे. कास, मडुरा, सातोसे सीमेलगत प्रवेश केलेला हा हत्ती अजूनही याच भागात असल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. मंगळवारी दुपारी मडुरा-सातार्डा मार्गावर काळा आंबा येथे तासभर हत्तीने भर रस्त्यावरच ठाण मांडले होते. यामुळे वाहने अडकून पडली होती. हत्ती कोकण रेल्वे मार्गावर येऊ नये, यासाठी वनविभागाचे पथक प्रयत्न करीत होते. हत्तीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.