गुहागरच्या समुद्रात बुडाला किशोरवयीन मुलगा

मयुरेश पाटणकर
रविवार, 14 मे 2017

गुहागर येथील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांपैकी बारा वर्षांचा पुष्कराज पाटील हा किशोरवयीन मुलगा आज (रविवार) सकाळी पाण्याच्या लाटेत वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी : गुहागर येथील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांपैकी बारा वर्षांचा पुष्कराज पाटील हा किशोरवयीन मुलगा आज (रविवार) सकाळी पाण्याच्या लाटेत वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील बहे या गावातील पाटील कुटुंब गुहागरमधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. पुष्कराज, त्याच्या दोन बहिणी आणि आई-वडिल असे एकूण सात जण समुद्र किनाऱ्यावर आले होते. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान पुष्कराज आपल्या वडिल आणि बहिणींसोबत पोहण्यासाठी समुद्रात उतरला. त्यावेळी समुद्राच्या ओहोटीची वेळ सुरू आहे. मात्र वळवाचा पाऊस सुरू होता. त्यावेळी ओहोटीच्या लाटेत पुष्कराज अचानक पाण्यात बुडू लागला. वडिलांनी त्याच्या हाताला धरून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पुष्कराजचा हात त्यांच्या हातात सुटला आणि पुष्करात समुद्रात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक तैनात आहेत. मात्र त्यांची ड्युटी सकाळी दहानंतर सुरू होते. दरम्यान या प्रकाराबाबत पुष्कराजच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिलेली नाही. स्थानिकांच्या मदतीने पुष्कराजचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: One boy drowned in guhagar sea