esakal | chiplun | शिव नदीतील गाळ काढण्यासाठी एक कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

शिव नदीतील गाळ

चिपळूण : शिव नदीतील गाळ काढण्यासाठी एक कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : पालिकेच्या विशेष सभेत शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या शिव नदीतील गाळ उपसा करण्यासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही मंजूर करण्यात आली. शिव नदीतील अडीच किलोमीटर अंतरातील गाळ काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

जलसपंदा विभागाने दिलेल्या पत्रानुसार पालिकेने शहरातील नागरिकांकडून पूररेषेवर हरकती मागवल्या होत्या. बुधवारी हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस असताना पालिकेने याप्रश्नी विशेष सभा आयोजित केली होती. शिवाजीनगर डोंगरमाथ्यावर असलेल्या कचरा प्रकल्पाकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. पुरातील कचरा वाहून नेण्यासाठी अवजड वाहनांची या रस्त्यावरून वाहतूक झाल्याने या रस्त्याची आणखी दुरवस्था झाली आहे.

हेही वाचा: Ratnagiri : गुन्हे शोध, शिक्षांची संख्या वाढीची गरज; मंत्री सतेज पाटील

त्यामुळे एक महिन्याच्या आत या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे. अन्यथा, कचऱ्याची एकही गाडी प्रकल्पाकडे जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक उमेश सकपाळ यांनी दिला. यावर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ठराव झाल्यास तत्काळ निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे सांगितले.

मात्र, सकपाळ यांनी काहीही करा, मला महिन्यात हा रस्ता करून द्या, अशी मागणी केली. अडीच किलोमीटर अंतरातील गाळ...या सभेत वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ प्रश्नी चर्चा करताना नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी तुर्तास शिवनदी पालिकेच्या अखत्यारित येत असल्याने या नदीतील गाळाचा विचार व्हावा. वाशिष्ठीतील गाळा विषयी शासनस्तरावर निर्णय घेणे योग्य ठरेल, असे स्पष्ट केले. त्यानुसार शिव नदीतील अडीच किलोमीटर अंतरातील गाळ काढण्याचा निर्णय झाला.

loading image
go to top