शिरोड्यातील एकाचा समुद्रात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

वेंगुर्ले - वेळागर समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शिरोडा ग्रामपंचायतीचा कर्मचारी बुडाला. सचिन सदाशिव मुंगेकर असे त्यांचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे घडली.

वेंगुर्ले - वेळागर समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शिरोडा ग्रामपंचायतीचा कर्मचारी बुडाला. सचिन सदाशिव मुंगेकर असे त्यांचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे घडली.

श्री. मुंगेकर ग्रामपंचायतीचे हंगामी कर्मचारी होते. आज सुट्टी असल्यामुळे ते वेळागर परिसरात अंघोळीसाठी गेले होते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते समुद्रात ओढत जाऊन बुडाले. समुद्रात कोण तरी बुडाले, असे समजताच सागर सुरक्षा रक्षकांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळाने पाण्यात मृतदेह दिसल्याने त्यांनी तो बाहेर काढला आणि पोलिसांना माहिती दिली. ही घटना कळताच पोलिस पालवे, श्री. भिसे व श्री. वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. सचिन यांच्या मागे पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in Drowning incidence on Shiroda Beach