मालवणच्या समुद्रात महिलेचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

मालवण - येथील चिवला वेळा येथे पोहण्याचा सराव करणाऱ्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. सुरेखा संजय गलांडे (वय ४८, रा. कार्तिकनगर, नाशिक) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. अत्यवस्थ स्थितीत त्यांना उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 

मालवण - येथील चिवला वेळा येथे पोहण्याचा सराव करणाऱ्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. सुरेखा संजय गलांडे (वय ४८, रा. कार्तिकनगर, नाशिक) असे त्यांचे नाव आहे. अत्यवस्थ स्थितीत त्यांना उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 

गलांडे यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. आज सकाळी गलांडे पोहण्याचा सराव करण्यासाठी चिवला वेळा समुद्रात उतरल्या. समुद्रात काही अंतर गेल्यानंतर त्या अत्यवस्थ झाल्याने त्या बुडू लागल्या. स्थानिकांनी समुद्रात उड्या मारून त्यांना बाहेर काढले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ताता मसूरकर, मनोज मेतर, रोहित मेतर, रुजाय फर्नांडिस, फान्सिस फर्नांडिस, जॉन्सन रॉड्रिक्‍स, पावलू सोज, किशोर वेंगुर्लेकर, राकेश वेंगुर्लेकर, नागेश मसूरकर, रिचर्ड सोज, बस्त्याव फर्नांडिस आदी स्थानिक होते. पाच ते सहा बोटींच्या साहाय्याने महिलेला समुद्रातून बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयातून गलांडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. महिलेच्या उपचारासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, तसेच इतर स्थानिक नागरिक यांनी धावपळ केली होती. महिलेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.

Web Title: One dead in Malvan Beach