जानवलीजवळील अपघातात दुचाकीस्वार जखमी 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

कणकवली - महामार्गावर डंपरला धडक बसून झालेल्या अपघातात नांदगाव येथील दुचाकीस्वार जखमी झाले. हुसेन मझरूद्धीन मियान (वय 45) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात महामार्गावर जानवली एसटीबस पिकअपशेड समोर सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला.

याप्रकरणी डंपर चालक संजू निळकंठ राठोड यांनी पोलिसात खबर दिली. राठोड हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन राजापूर पाचल ते आचरा असे येत होते. महामार्गावर जानवली येथे रस्त्यावर जनावरे आडवी आल्याने डंपर चालकाने ब्रेक केला. या वेळी पाठीमागून येणाऱ्या हुसेन यांना अंदाज न आल्याने मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: one injuried in two wheeleraccident near Janavali