one murder of girl in kokan topic of threat of ship defame
one murder of girl in kokan topic of threat of ship defame

क्षणिक रागातून दगडाने ठेचून केला युवतीचा खून

रत्नागिरी : क्षणिक रागातूनच खेडशी येथील मैथिलीचा दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. बकऱ्या चरत असताना एक बकरी संशयिताने चोरण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. बकरी परत दिली नाहीस तर माझ्यावर जबरदस्ती केल्याची बोंब करीन, अशी धमकी तिने दिली. त्यामुळे संशयित बकरी सोडून  गेला, मात्र आपल्याविरोधात आधीच तक्रारी आहेत. ही पुन्हा आपली बदनामी करणार, या विचाराने तो संतापला. झुडपाजवळ बसलेल्या मैथिलीच्या डोक्‍यात मागून दगड घालून तिचा खून केला. अशी कबुली संशयिताने दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

नीलेश ऊर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर (वय ३५, रा. भंडारवाडी-खेडशी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. आज त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही घटना ९ ऑगस्ट २०१९ ला सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास खेडशी-चिंचवाडीसडा येथे घडली होती. मैथिली गवाणकर (वय १७, रा. चिंचवाडी-खेडशी) ही खेडशी महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत होती. सायंकाळी चारच्या सुमारास शेळ्या घेऊन चिंचवाडी सडा येथील जंगलात गेली होती. ती परत आली नाही.

आई-वडिलांनी वाडीतील ग्रामस्थांसह रात्री साडेनऊपर्यंत शोध घेतला. वडील प्रवीण गवाणकर यांनी मैथिली बेपत्ता झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. रात्री वाडीतील काही ग्रामस्थांना एका झाडाखाली मैथिलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज होता, परंतु मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तिच्या डोक्‍यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी (३०) सप्टेंबरला संशयित नीलेशला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. 

संशयिताचे त्याच्या पत्नीशी काही वर्षांपासून वाद होते. त्याच्याविरोधात यापूर्वीच काही तक्रारी होत्या. बकरी चोरल्यावरून मैथिलीने जबरदस्ती केल्याची बोंब केल्यास आपल्याला पुन्हा गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या विचारामुळे नीलेशचा पारा चढला. झुडपाजवळ मोबाईल बघत बसलेल्या मैथिलीच्या डोक्‍यात मागून दगड घातला. ती जागेवरच आडवी झाली. त्यानंतर तिला ओढत दुसऱ्या झुडपाखाली नेत तिथे पुन्हा डोक्‍यात दगड घालून तिचा खून केला.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com