मातांच्या बॅंक खात्यात ८ कोटी १६ लाख जमा !

under the central government policy to mother's bank account deposit amount in ratnagiri
under the central government policy to mother's bank account deposit amount in ratnagiri

रत्नागिरी : केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या मातांच्या बॅंक खात्यात ८ कोटी १६ लक्ष १६ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. कोरोनातील टाळेबंदीतही त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केली.

माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येते. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच स्तरातील पहिल्या खेपेच्या गर्भवती मातांना या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून सकस आहार घेण्यास प्रवृत्त करणे, तसेच ग्रामीण व शहरी भागातील महिलांना गरोदरपणाच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या मजुरीची भरपाई व्हावी, हा उद्देश आहे. मातृवंदना योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यात पाच हजार रुपये अनुदान, पहिल्या खेपेच्या मातांना, आधार संलग्न बॅंक खात्यांवर जमा केले जातात.

जिल्ह्यात या योजनेची लॉकडाउनच्या कालावधीत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत २,२०१ मातांना ८९ लाख ७९ हजार रुपयांचा लाभ पहिल्या खेपेच्या गरोदर व स्तनदा मातांना योजनेंतर्गत दिला आहे. योजनेच्या सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या मातांच्या बॅंक खात्यात ८ कोटी १६ लाख १६ हजार रुपये जमा केले आहेत.

पहिल्या खेपेच्या गरोदर मातांची नोदणी व प्रसुती बहुधा खासगी रुग्णालयात केली जाते. त्या मातांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी पहिल्या खेपेच्या मातांनी पहिल्या १२ आठवड्याच्या आत नोंदणी करणे, सर्व तपासण्या, आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते क्रमांक व माताबाल संरक्षक कार्डाची व बाळाच्या जन्मदाखल्याची छायांकित प्रत देणे आवश्‍यक आहे. 

मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थ्यांची आकडेवारी अशी

तालुका           लाभार्थी         अनुदान (रुपये)
मंडणगड           ८९४             ३५,९४,०००
दापोली             १८०३             ७३,७२,०००
खेड                 १९९६             ७६,१७,०००
गुहागर              १३८२             ५१,६४,०००
चिपळूण            २७१४          १,०७,८०,०००
संगमेश्‍वर           २४४०             ९९,८४,०००
रत्नागिरी             ३९१६           १,५८,०६,०००
लांजा                 १४२४              ५८,५९,०००
राजापूर              १७३४              ६९,६६,०००
शहरी भाग          २१५५              ८४,७४,०००

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com