esakal | म्यूकरमायकोसिस; लक्षणे दिसताच उपचार घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

म्यूकरमायकोसिस; लक्षणे दिसताच उपचार घ्या

म्यूकरमायकोसिस; लक्षणे दिसताच उपचार घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : कोविड झालेल्या रूग्णांना (covid-19 patients) राज्यात काही ठिकाणी म्यूकर मायकोसिस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची (mucor meiosis one patient found) लागण झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही (ratnagiri district) याचा एक बाधित आणि एक संशयित रुग्ण सापडला आहे. म्यूकरमायकोसीस या आजाराचे निदान वेळीच झाल्यास तो बरा होतो, असे राज्यात दिसून आले आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. (one person of mucor meiosis found in ratnagiri alert from authority)

इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारा म्यूकरमायकोसीसबाबत मार्गदर्शक तत्वेही जाहीर केली आहेत. म्यूकरमायकोसीस या आजाराला काळी बुरशी असेही म्हटले जाते. हा बुरशीजन्य आजार असून शरीरातील रोगप्रतिकारक (immunity power of human body) शक्ती कमी झाल्यामुळे होतो. शासनाकडून या आजाराला साथरोग आजार म्हणूनही घोषित केले आहे. आरोग्य विभाग प्रशासन या रोगाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. स्टेरॉईडचा वापर या आजाराची लागण होण्यातील एक प्रमुख घटक आहे. स्टेरॉईडमुळे फुफुसामधील दाब कमी होतो. रोगप्रतिकारक शक्तीच्या अनियंत्रित प्रतिक्रियेमुळे होणारे नुकसान टाळले जाते. तथापि, यामुळे मधुमेह असलेल्या व नसलेल्या दोन्ही व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ते म्युकरमायकोसीस होण्यास कारणीभूत ठरते. जिल्ह्यात एक बाधित तर एक संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरमधून पसार झालेला न्यायालयीन बंदी अखेर जेरबंद

म्युकरमायकोसीस म्हणजे काय आहे

म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) हा बुरशीजन्य आजार असूनही बुरशी माती, वनस्पती, हवा, खराब झालेली फळे व भाजीपाला, शेण इत्यादी ठिकाणी आढळते. तसेच ही बुरशी निरोगी माणसाच्या नाकामध्येही आढळून येवू शकते.

कसा शोधावा संशयित रुग्ण

डोळे दुखणे, नाक बंद होणे, चेहऱ्यावर बधीरता येणे, दिसायला कमी किंवा दोन, दोन प्रतिमा दिसणे, डोळयाला सूज येणे, डोळा लाल होणे, डोळे दुखून उलटी होणे, वागण्यामध्ये बदल (नातेवाईकांना विचारणे), नाकातून रक्त किंवा काळा स्त्राव येणे, अशी त्याची लक्षणे आहेत.

हेही वाचा: पालेभाज्या कडाडल्या; आवक घटल्याने दर वाढले

मृत्यूदर ५० टक्केच्या आसपास

या आजारामध्ये प्रामुख्याने सायनसमध्ये बाधा होते. तेथून डोळे, मेंदू, जबडा तसेच फुफ्फुसापर्यंत पसरु शकतो. मधुमेह असलेले रुग्ण, तसेच रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, कॅन्सर बाधित रुग्ण, एचआयव्ही-एड्‌स बाधित रुग्ण व सद्यस्थितीत कोविड करीता स्टेरॉईडचे उपचार घेणारे रुग्णांमध्ये या बुरशीच्या संसर्ग झाल्यास गंभीर स्वरुपाचा आजार उद्‌भवू शकतो. या आजारात मृत्यूदर ५० टक्केच्या आसपास आहे.