esakal | तेलही नाही, तूपही नाही, हातच धुपाटनही गेलं..!
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud with our youth he buy a scooter and transfer 51000 for second hand scooter in konkan

आम्ही वारगावला आलो असे सांगत पार्सल लॉग इन करण्यासाठी १० हजार रुपये पाठविण्यास सांगितले.

तेलही नाही, तूपही नाही, हातच धुपाटनही गेलं..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : ऑनलाइन माध्यमातून जुनी स्कूटर खरेदी करणे खारेपाटणच्या युवकाला महागात पडले आहे. १५ हजार रुपयांची स्कूटर खरेदी करण्यासाठी त्या युवकाने तब्बल ५१ हजार ६०० रुपये मोजले. मात्र या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आज येथील पोलिसांत तक्रार दिली.

हेही वाचा -  वाली नाही कुणी, कोरोनाने ग्रासले, आता तुम्हीही लुटा ! 

खारेपाटण कर्लेवाडी येथील सूरज गुदळे (वय २३) हा ३१ ऑगस्ट रोजी फेसबुक पाहत असताना, त्याला जुनी स्कूटरच्या विक्रीची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवरील फोन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर गाडी विक्री करणारा आणि सूरज यांच्यात हिंदीतून संवाद झाला. यात १५ हजार रुपयांना गाडीचा सौदा पक्‍का झाला. त्यानंतर गाडी विक्री करणाऱ्या व्यक्‍तीने स्कूटरचे फोटो, गणेश खामकर नाम व्यक्‍तीचे आधारकार्ड, कॅन्टीन स्मार्ट कार्ड आणि गाडीची कागदपत्रे ऑनलाइन पाठवली. तसेच ३ हजार रुपये गुगल पे वरून ॲडव्हास पाठवायला सांगितले.

सूरज गुदळे याने ते पाठवले. त्यानंतर पुन्हा ३ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी २ हजार आणि ५ हजार अशी रक्‍कम पाठविण्यास सांगितली. सूरज याला गाडी खरेदी करायची असल्याने ती रक्‍कम देखील त्याने गुगल पे वरून ट्रान्सफर केली. १ सप्टेंबरला गाडी विक्री करणाऱ्या आर्मी पोस्टमन असे नाव सांगणाऱ्या व्यक्‍तीचा फोन सूरज याला आला. आम्ही वारगावला आलो असे सांगत पार्सल लॉग इन करण्यासाठी १० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा ९ हजार १०० रुपयांची मागणी करण्यात आली.

हेही वाचा -  नारळाच्या कलाकृतीतून होत आहे रोजगार निर्मीती ; कोकणकरांचा उपक्रम...

ही रक्‍कम पाठविल्यानंतरही ऑनलाइन व्यवहार फेल झाल्याचे सांगत सूरज याच्याकडून पुन्हा ९ हजार रुपये दोन वेळा भरून घेण्यात आले. त्या पाठोपाठ पार्सल लॉगइन करण्यासाठी १८ हजार ३०० रुपये फायनल भरण्यास सांगण्यात आले. सरतेशेवटी जीएसटीचे ७२०० रुपये भरा असा फोन आल्यानंतर सूरज गुदळे याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने आज आर्मी पोस्टमन या व्यक्‍ती विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार नोंद केली.

संपादन - स्नेहल कदम