esakal | Good News : कोकणात जायला बुकिंग सुरु, मात्र हे आहेत नियम
sakal

बोलून बातमी शोधा

online offline booking start tomorrow in konkan for tourist hotels and resorts open from tomorrow

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं ही बुकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. 

Good News : कोकणात जायला बुकिंग सुरु, मात्र हे आहेत नियम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : हॉटेल, रेस्टारंट आणि ई-पासबाबत काही नियम शिथिल केल्यानंतर एमटीडीसीने उद्यापासून कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या क्षमतेच्या 33 टक्के बुकिंग घेतली जाणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं ही बुकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याची माहिती दिली आहे.

हेही वाचा - तीन पदरी बोगदा, त्यात दोन भुयारी मार्ग, कुठल्या घाटात सुरू आहे गतीने काम... वाचा 

पर्यटकांना सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे. पर्यटकांचे तापमान, त्याच्या शरिरातील ऑक्सिजनची लेव्हल देखील तपासली जाणार आहे. फेसमास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर या गोष्टी बंधनकारक केल्या असून गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला केवळ 33 टक्के बुकिंग होणार असून टप्प्याटप्प्यानं यामध्ये वाढ केली जाणार आहे. 33 टक्के ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर काऊंटर बुकिंग केली जातील. पण, 33 टक्के ऑनलाईन बुकिंग पूर्ण झाली असल्यास काऊंटर बुकिंग मात्र केली जाणार नाहीत.

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता वेळणेश्वर, गणपतीपुळे, सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर येथील हॉटेल्स सुरू केली जाणार आहेत.  मात्र कन्टेनमेंट झोनमधील पर्यटकाला बंदी असणार आहे. शिवाय, ज्या ठिकाणी क्वॉरंटाईन सेंटरकरता ज्या रिसॉर्ट आणि हॉटेलचा वापर केला होता ती सर्व टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार आहेत.

हेही वाचा -  कोकण किनारपट्टीवर सात ते आठ मिनी पर्ससीन नौकांची घुसखोरी, कुठे घडला हा प्रकार वाचा 

पर्यटन व्यवसाय सुरू होत असला तरी पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. विदेशी पर्यटक येथे येण्याची शक्यता नसल्याने देशातील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी त्यांच्या आरोग्याची हमी घेण्याबरोबर जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासनाने मंत्रालय स्तरावर टूर ऑपरेटर्स, पर्यटन व्यावसायिक यांची एक समिती नेमून आवश्यक उपाययोजना राबवायला हव्यात अशी मागणी होत आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image