अत्यावश्‍यक सेवेसाठी ऑनलाईन पासची सुविधा 

Online Pass Facility For Essential Service Sindhudurg Marathi News
Online Pass Facility For Essential Service Sindhudurg Marathi News

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अत्यावश्‍यक सेवेसाठी वाहतूक परवाना मिळण्यासाठी तयार केलेल्या ऍपमध्ये परिपूर्ण माहिती भरल्यास व ती योग्य असल्यास केवळ 3 मिनिटांत ई-पास मिळतो. यासाठी कोणत्याही पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही. घरी बसूनच हे पासेस दिले जात आहेत. आज पहिल्या दिवशी 1244 पासेस देण्यात आले आहेत. तर 585 व्यक्तींची ई-पास विनंती फेटाळण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. 

सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी परवाने देण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने ऍप तयार केले असून या माध्यमातून वाहतुकीचे सर्व प्रकारचे परवाने देण्यात येत आहेत. नागरिक घरबसल्या हे ऍप डाऊनलोड करून अत्यावश्‍यक प्रवासासाठीचे परवाने घेऊ शकतात. यासाठी covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन ऍप डाऊनलोड करावा लागणार आहे. ही प्रक्रिया सुलभ असून त्यात कोणताही वेळकाढूपणा नाही. 

पत्रकारांना ई-पासची गरज नाही 

जिल्ह्यात सध्या संचारबंदी आहे. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून नागरी क्षेत्रात दुचाकी बंदी केलेली आहे. यात अत्यावश्‍यक सेवेसाठी सवलत दिलेली आहे; मात्र यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या covid19.mhpolice.in या ऍपपवर जावून ई-पास घ्यावा लागणार आहे. हे पास असलेल्या व्यक्तींनाच परवानगी मिळणार आहे; मात्र यातून जिल्ह्यातील पत्रकारांना सुट दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com