प्रविण दरेकर पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

चिंचखरीतील ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहून कृषीसाठी विशेष योजना भाजपच्या माध्यमातून आखण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

रत्नागिरी : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या रत्नागिरी तालुका दौऱ्याला सुरुवात झाली. तालुक्यातील चिंचखरीतील भात शेतीच्या नुकसानीची पहाणी त्यांनी केली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी येथील सामूहिक शेतीचे कौतुक केले. चिंचखरीतील ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहून कृषीसाठी विशेष योजना भाजपच्या माध्यमातून आखण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

हेही वाचा - निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील दुर्गा

दरम्यान पीक कर्ज, राष्ट्रीय बँकांकडून होणार त्रास, महावितरण यांच्याकडून होणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी मांडल्या. माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपच्या रत्नागिरी पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी जागेवरच उत्तर द्या, असे प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत. अडचणी सोडवण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी एकत्रित तुमच्यासोबत असतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -  दोन नौकांना लागला बंपर सरंगा अन् एका दिवसातच मच्छीमार झाले लखपती

यावेळी निलेश राणे यांनी  प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न आणि बँक अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तत्काळ अडचणी सोडवूया असे सांगितले. दरम्यान जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन,आ. प्रसाद लाड हेही उपस्थित होते. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposite party member pravin darekar on konkan tour for today observation of damages in farming in ratnagiri