पारंपारीक लोककला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावावातील तरूणांचा पुढाकार

अमित गवळे
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पाली - बाल्या व माळी नाच हा कोकणातीळ ग्रामिण पारंपारीक नृत्यप्रकार विलुत्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

पाली - बाल्या व माळी नाच हा कोकणातीळ ग्रामिण पारंपारीक नृत्यप्रकार विलुत्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

कोकणात मुख्यतः रायगड जिल्ह्यात गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी व होळी अशा विविध सणांमध्ये गावा खेड्यात पारंपारीक बाल्या डांस आणि हि नाच मंडळी अनेक वर्षापासून आपली पारंपारीक काल सादर करत आहे. नाचण्याची विशिष्ठ व आकर्षक ठेका व लय, कपड्यांचा वेगळेपणा आणि काळजाला भिडणारी पारंपारीक, प्रबोधनात्मक गाणी व संगीत यामुळे अनेक वर्षांपासून बाल्या व माळी डांस खुप लोकप्रिय होता. मात्र आधुनिकतेच्या युगात समाजामध्ये बाल्या नाच आणि माळी नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे. तरुण पिढिने या कडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे ही लोककला अाता लोप पावत चालली आहे. आपल्या पुर्वजांची हि कला टिकावी, तिचे जतन व्हावे यासाठी दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुण मागील दहा वर्षापासून स्वतः ही कला सादर करुन जोपासत आहेत. यातील अनेक तरुण पदविधर आहेत तर कोणी इंजिनियर देखिल आहेत. मात्र प्रत्येकजण तनमनधनाने कोणताही संकोच न बाळगता हि कला सादर करतात व त्यासाठी मेहनत घेत आहेत. तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा या तरुणांना ही कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. ही कला जतन करण्यासाठी गावातील लोकांचा खुप मोठा सहभाग आहे. प्रत्येक कार्यक्रमावेळी दुरशेत गावातील ग्रामस्त तरुणांसोबत असतात. विशेष म्हणजे आपली पारंपारीक कला आपली मूल आपली नातवंड पुढे नेतात याचा गावातील वृद्धांना खूप आनंद व समाधान वाटते.

आपल्या भावी पिढीला हि कला समजावी व त्यांनी देखिल हि पारंपारी कला अधिक समृद्ध करावी यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मागील दहा वर्षांपासून ही कला जतन करत आहोत. गावातील सर्व ग्रामस्त आम्हाला प्रोत्साहन देवून सहकार्य करतात. पारंपारीक कला टिकावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
समाधान म्हात्रे, तरुण कलाकार, दुरशेत, पेण

Web Title: In order to keep traditional folk art alive, young people in the villages