Mumbai Goa Highway Toll : ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू; मासिक 350 रुपयांचा पास की 50 टक्के सूट? जाणून घ्या वाहननिहाय टोलचे संपूर्ण दर

Osargaon Toll Plaza Sindhudurg vehicle toll exemption : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर आजपासून वसुली सुरू झाली. सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळणार का, याबाबत संभ्रम असून स्थानिक वाहनांसाठी ३५० रुपयांचा मासिक पास लागू करण्यात आला आहे.
Osargaon Toll Latest News

Osargaon Toll Latest News

esakal

Updated on

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका आज (ता. १७) सकाळी आठ वाजल्‍यापासून सुरू होत आहे. यात वाहननिहाय टोलचे दर महामार्ग प्राधिकरण विभागाने निश्‍चित केले (Mumbai Goa Highway Osargaon toll latest update) आहेत. त्‍यानुसार अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र, या टोल नाक्‍यावर सिंधुदुर्गातील नोंदणी असलेल्‍या वाहनांना टोलमाफी मिळणार की नाही? याबाबत वाहनचालकांमध्ये संदिग्‍धता आहे. कारण स्थानिक अवाणिज्यिक वाहनांना मासिक ३५० रुपये पास द्यावा लागेल आणि इतर वाहनांना टोल कराच्या पन्नास टक्‍के टोल द्यावा लागेल, असे महामार्ग विभागाने स्पष्‍ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com