चारशे नौकांचे अतिक्रमण ; रत्नागिरी, गुहागर किनाऱ्यावर लाखोंच्या मच्छीची लूट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

घुसखोरी रत्नागिरीतील मत्स्योत्पादन घटण्याला कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

रत्नागिरी : दसऱ्याच्या मुहूर्तांवर मलपी (कर्नाटक) नौकांनी रत्नागिरी, गुहागर किनाऱ्यावर मच्छीची लूट केली आहे. चारशे नौका अतिक्रमण करून जिल्ह्याच्या हद्दीत मासेमारी करत आहेत. एका नौकेला सुमारे वीस टनाहून अधिक मासळी मिळाल्याचा अंदाज असून, त्याची किंमत सुमारे ७० ते ८० लाखांत जाईल. ही घुसखोरी रत्नागिरीतील मत्स्योत्पादन घटण्याला कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अनेक वर्ष सुरू आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गात शिक्षकांची 500 पदे रिक्त -

जयगडसह गणपतीपुळे परिसरात काही दिवसांपूर्वी मच्छीमारांना घोळ, सरंग्याची लॉटरी लागली. लाखा-लाखाची मासळी मिळत असल्यामुळे मलपी नौका कोकणाकडे वळत आहेत. एकाचवेळी या सर्व नौका किनाऱ्यावर येत असल्यामुळे प्रशासनही हतबल आहे. स्थानिक मच्छीमारांपुढे या परराज्यातील नौकांचे संकट उभे आहे. कर्नाटकमधील शेकडो नौका गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहेत.

शिंगाडा, घोळ, म्हाकूळ, रिबन, बांगडा यासारखी उत्पन्न देणारी मासळीवर या नौकांनी घाला घातला. रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड, पावस तर गुहागर तालुक्‍यातील केळशी, दापोलीमधील हर्णैपासून ते थेट श्रीवर्धनपर्यंत त्यानी धुमाकूळ घातला आहे. कर्नाटकमध्ये मासळीचा तुटवडा असल्याने या अत्याधुनिक नौका कोकण किनाऱ्याकडे वळल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्‍त केला.

हे भले मोठे ट्रॉलर्सला ६०० ते ८०० हॉर्सपॉवरचे इंजिन असल्यामुळे वादळी परिस्थितीतही मासेमारी करतात.
जिल्ह्यात मासेमारी करताना एका बोटीला सध्या २० ते २५ टन मासा मिळतो. घोळीसारखा सोनेरी मासाही सापडतो. एकूण मासळीची किंमत ८० लाखांपर्यंत जाते. मत्स्य विभागाने या परराज्यातील मच्छीमारांवर कारवाई करण्याची मागणीही सुरू आहे, मात्र मत्स्य विभागाच्या बोटी कमी हॉर्सपॉवरच्या आहेत. 

हेही वाचा - संरक्षित क्षेत्रामुळे भूमिपूत्र अस्वस्थ -

"आधीच वातावरणामुळे मासळी मिळणे दुरापास्त आहे. त्यात परप्रांतीय नौका किनाऱ्यावर येऊन मासेमारी करू लागल्या तर हाल होतील. स्थानिकांच्या वाट्याला मासळीच शिल्लक राहणार नाही. याकडे शासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे."

- श्रीदत्त भुते, मच्छीमार
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: other state boats are entered in ratnagiri to theft a fishing in ratnagiri see are its disadvantages for local fisherman