esakal | रात्रीस खेळ चाले म्हणत, कोकणात यांनी मांडलाय उच्छाद ; तोंडचा घास घेत आहेत हिरावून
sakal

बोलून बातमी शोधा

other state fishermen entry in our see area and fishing without permission this problem faced by a local dharman in ratnagiri

मत्स्य विभागाची गस्तीनौका मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

रात्रीस खेळ चाले म्हणत, कोकणात यांनी मांडलाय उच्छाद ; तोंडचा घास घेत आहेत हिरावून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालवण : राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी केली असून कोट्यवधी रुपयांच्या मत्स्यधनाची लूट ते करत आहेत. पंधरा ते अठरा वावात हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी दिसून येत आहे. मत्स्य विभागाची गस्तीनौका मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण परतवून लावणार कोण? असा सवाल पारंपरिक मच्छीमार करत आहेत.

हेही वाचा - आता सरकारी नोकरीसाठी असणार ही नवीन अट 

यासंदर्भात पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी आज सहाय्यक मत्स्य आयुक्त भादुले यांची येथील कार्यालयात भेट घेऊन गस्ती नौकेबाबत विचारणा केली असता येत्या तीन-चार दिवसांत गस्ती नौका कार्यान्वित होईल, अशी ग्वाही मत्स्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून दिली. पराडकर म्हणाले, ‘‘मत्स्य हंगाम आता कुठे सुरू होतोय न होतोय तोवर शेकडोच्या संख्येने आलेले परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवून नेत आहेत.

स्थानिक मच्छीमार गिलनेट पद्धतीची पारंपरिक मासेमारी करायला गेले असता त्यांना समुद्रात जाळी टाकणेही मुश्‍कील बनले आहे. परराज्यातील अवाढव्य हायस्पीड ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तरी शासनाने वेळीच पराराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण रोखणे गरजेचे आहे.  

हेही वाचा - पोलिसांची धावपळ, तरीही `तिचे` गुढ कायमच 

राज्याच्या वाट्याची सागरी संपत्ती परराज्यातील ट्रॉलर्स असेच लुटू लागले तर स्थानिक मच्छीमारांनी करायचे काय? शासनाची गस्ती नौका येईपर्यंत स्थानिक मच्छीमारांना परराज्यातील ट्रॉलर्स मासे शिल्लक ठेवतील असे वाटत नाही. महाराष्ट्राच्या वाट्याचे मत्स्यधन लुटणाऱ्या या ट्रॉलर्सवर राज्य शासनाने लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करावी.’’ त्यांना राज्याच्या सागरी हद्दीतून पिटाळून लावावे, अशीही मागणी पराडकर यांनी विभागाकडे केली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top