esakal | सिंधुदुर्गात सह्याद्री पट्ट्यात भूकंपाचा सौम्य धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

Otwane Charatha  Karivade  Madkhol area earthquake shocks in sindhudurg

सह्याद्री पट्ट्यातील काही भागातील ग्रामस्थांना रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी हलल्यासारखे जाणवले.

सिंधुदुर्गात सह्याद्री पट्ट्यात भूकंपाचा सौम्य धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरासह ओटवणे, चराठा, कारिवडे, माडखोल भागाला आज रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक  सौम्य धक्का जाणवला. हा प्रकार भूकंपाचा होता की अन्य कशामुळे हे स्पष्ट होऊ शकले नाही. सह्याद्रीच्या काही भागातही असा प्रकार घडला.


 याबाबत अनेकांनी दुजोरा दिला; मात्र तिलारी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक उप अभियंता बाळासाहेब अजगेकर यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

हेही वाचा- Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गात रेड अलर्ट ; वादळ केळशीच्या दिशेने -


तालुक्‍यातील ओटवणे, चराठा, माडखोल, कारिवडे तसेच सह्याद्री पट्ट्यातील काही भागातील ग्रामस्थांना रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी हलल्यासारखे जाणवले. याबाबत येथे राहणारे  अनिल कुडाळकर यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला. ओटवणे येथेही काहींना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, काहींनी घरातील वस्तू हलल्याचे सांगितले; मात्र याबाबत अजगेकर यांना विचारले असता आपण सावंतवाडीतच होतो; मात्र आपणाला याबाबत काहीच जाणवले नाही, तिलारी कोनाळकट्टा येथील भूकंपमापक यंत्रणेलाही विचारण्यात आले. तरीही काहीच दर्शविण्यात आले नाही. त्यामुळे असा कोणताही प्रकार तालुक्‍यात घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अर्चना बनगे