
राजापूर: सागरी महामार्गावरील तालुक्यातील मिठगवाणे येथील बसथांब्याच्या पुढे काही अंतरावर टेंपो उलटून महिला ठार, तर चालकासह ६ गंभीर जखमी झाले. बुधवारी (ता. १३) सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये यातील वाघ्रण येथे राहणाऱ्या शीतल सोमा जाधव (वय ६०) या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नाटे पोलिसांनी दिली. अन्य गंभीर जखमी झालेल्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविले. नाटे पोलिसांनी टेंपोचालक संतोष आबा नाचणेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.