मासेमारीसाठी पागेर हे एक प्रमुख साधन

लक्ष्मण डूबे 
बुधवार, 20 जून 2018

रसायनी (रायगड) : पारंपारिक मासेमारीसाठी पागेर हे एक प्रमुख साधन म्हणुन ओळखले जात आहे. आताची तरूण पिढी विणकामाचा कंटाळा करत असल्याने परिसरात पागेर विणकाम करणाऱ्यांची संख्या घटु लागली आहे. मात्र, आजुनही खेडेगावात 60 वयोगटातील नागरिक पागेर विणताना दिसत आहे. पागेर टाकुन मासेमारी करताना जास्त मासे मिळतात त्यामुळे पागेरचा वापर करणे फायद्याचे आहे. 

पाताळगंगा नदीत परीसरातील आदिवासीवाडीतील आदिवासी बांधव आणि काही शेतकऱ्यांना रोजनदारीची काम आपुरी पडत आहे. म्हणुन काही शेतकरी तसेच आदिवासी पूर्वी पासुन नदीत मासेमारी करत आहे. मासेमारी करणारे पूर्वी पागेर घरीच विणत होते. पागेर फावल्या वेळेत विणकाम केले तर एक महिन्याचा कालावधी लागतो. धागा आणि मणी यासाठी सुमारे बाराशे रुपये खर्च येतो. घरी बनविलेले पागेर मासेमारी करताना काळजी घेतली तर तीन वर्षे टिकतात. पंधरा किलोचा मासा आडकला तरी तुटू  शकत नाही. दर वर्षी शेतीची काम आटोपल्यानंतर फावल्या वेळेत विण काम करतो. एक तरी पागेर विणतो तसेच  विकले तर पाच हजार रुपये मिळतात. असे खंडु धुरव यांनी सांगितले. बाजारात पागेर दोन तीन हजार रुपये किंमतीत मिळतात पण धागे चांगले नसतात आणि विण काम बरोबर नसते त्यामुळे जास्त दिवस टिकत नाही असे सांगण्यात आले. 

पागेर विण्याचे काम किचकट आणि कंटाळवाणी असते. त्यामुळे हलीचे तरूण आशी काम करण्यासाठी धजत नाही. पूर्वी रोजंदारीची साधन आपुरी होती. आता परीसरात कारखानदांरी आली आहे. तरूणांना रोजगार मिळत आहे. तरूण मंडळी फारशी मासेमारीकडे वळत नाही त्यामुळे  घरी पागेर विणकाम करणा-यांची संख्या घटली आहे. असे खंडु धुरूव यांनी सांगितले. 

मासेमारी करिता पागेर किंवा गळ टाकणे ही साधन चांगली आहे. हाल्ली पाण्यात बाँम्ब फोडुन किंवा रसायन टाकुन आघोरी साधनाचा वापर मासेमारी करताना केला जाता आहे. त्यामुळे छोटे मासे तसेच इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात तसेच नदीचे प्रदूषण वाढत आहे. आघोरी साधनाचा वापर करून मासेमारी करणा-यावर बंदी घातली पाहिजे. 

-लक्ष्मण जांभळे, चांभार्ली 

Web Title: Pager is a major means of fishing