

Mokhada Ambulance Drops Tribal Mother Two Kilometers Away
Sakal
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील आमला गावाचे माहेर असलेल्या सविता बांबरे (20) या प्रसूत महिलेला अर्ध्यावर रस्त्यात, गावाच्या दोन किलोमीटर मागे रुग्णवाहिका चालकाने सोडले. त्यामुळे दोन दिवसाच्या बाळाला हातात घेऊन प्रसूत सविताला अभयारण्यातून दोन किलोमीटर पायपीट करत घर गाठावे लागले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशील कारभारावर टीकेची झोड ऊठली आहे. मोखाड्यातील केवनाळे येथील सविता बांबरे (20) या आदिवासी महिलेला 19 नोव्हेंबर ला प्रसूतसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सुखरूप प्रसूतीसाठी तिला जव्हारच्या ऊपजिल्हक रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिची प्रसूती सुखरूप झाली.