पाली अंनिसचा चमत्कार सादरीकरण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यक्रम

pali
pali

पाली - एनएसएसच्या रायगड जिल्हा लीडरशिप कॅंप मध्ये महा. अंनिसचा चमत्कार सादरीकरण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यक्रम शुक्रवारी (ता.28) संपन्न झाला. येथील शेठ जे. एन पालीवाला महाविद्यालयात या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चमत्कार सादरिकरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोननिर्माण करण्यात आला.

शेठ जे. एन पालीवाला महाविद्यालयाचे प्राध्यापक मधुकर बडगुजर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अंनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर व पाली शाखेचे सचिव अमित निंबाळकर यांनी पाण्यावर दिवा पेटवणे, पेटता पलीता हतावरून फिरविणे, जिभेतून तार अारपार बाहेर काढणे, हवेतून सोन्याची चैन व अंगारा काढणे, पेटता कापूर खाणे, रिकाम्या गडूमधून तीर्थ काढणे यांसारखे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सहभागाने करुन दाखविले. त्याद्वारे चमत्कारामागे विज्ञान आणि हातचलाखी कशी असते याची उकल करून सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती कशी जोपासायला हवी याबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. तसेच चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे अावाहन करण्यात आले.

यावेळी विदयार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या कार्यक्रमास एनएसएस चे प्रा. मधुकर बडगुजर, अनिंस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, पाली शाखा सचिव अमित निंबाळकर तसेच एनएसएस चे विद्यार्थी उपस्थित होते. शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयचे प्राचार्य युवराज महाजन यांनी या सर्व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विदयार्थ्यांसमोर वैज्ञानिक जाणीव जागृती सहजपणे निर्माण करता येते. विदयार्थ्यांमध्ये चिकित्सक व शोधक वृत्ती तयार होणे गरजेचे आहे. तरच अंधश्रद्धांचे समुळ उच्चाटन करता येईल. 
मोहन भोईर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जिथे एनएसएस आहे तेथील लीडरशिप कॅम्प मध्ये 28 तारखेला अंनिसचा कार्यक्रम असावा यामुळे हा कार्यक्रम घेतला आहे. विद्यार्थी देखील यामुळे कार्यकरण भावाने आचरण करतात.
प्रा. मधुकर बडगुजर, एनएसएस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com