

Ashtavinayak Pali Water Crisis Raises Health Concerns as Twenty Five Crore Water Supply Project Stays Pending
esakal
-अमित गवळे
पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस थांबल्याने अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले आहे. पालीकरांना थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी पुरवले जाते. नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी, कंपन्यांचे प्रदूषित पाणी, कचरा आणि वाळू उपसामुळे पाणी दूषित झाले असून नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे.