

Maharashtra Pali Garbage Problem Raises Concerns as Open Waste Disposal Continues Despite Door to Door Garbage Collection
sakal
-अमित गवळे
पाली: प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात कच-याची समस्या गंभीर झाली आहे. नगरपंचायत मार्फत शहरांमध्ये घंटागाड्या फिरून देखील काही नागरिक भर वस्तीत रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.