Pali News : सुधागड तालुक्यातील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

सुधागड तालुक्यातील पत्रकार गौस खान पठाण यांना पालीतील एकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
Gaus Khan Pathan
Gaus Khan PathanSakal

पाली - सुधागड तालुक्यातील पत्रकार गौस खान पठाण यांना पालीतील एकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी पत्रकार गौस खान पठाण पाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता फक्त ‘एनसी’ दाखल करून घेण्यात आली.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून अश्या प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे धमकी देणाऱ्या विरोधात पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समाजसेवक व सुधागड तालुक्यातील पत्रकारांनी पाली पोलिसांकडे शनिवारी (ता.27) निवेदनाद्वारे केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पालीतील एक स्कुल बस चालक बसमधून फी न भरलेल्या मुलाला उतरवित असताना पत्रकार गौस खान पठाण यांनी त्याला विचारणा केली. यात तुम्ही पडू नका, चालकाने असे सांगिल्यावर गौस खान पठाण तिथून निघून गेले.

मात्र स्कुलबसचे मालक राजेश राठोड यांनी या घटनेचा तसेच मागे काही महिन्यांपूर्वी एका बाबतीतील बातमीचा राग मनात असल्यामुळे राठोड यांनी गौस खान पठाण यांना फोनवरून जिवे मारण्याची तसेच तंगड्या तोडण्याची धमकी दिली व माझ्या विरोधात बातम्या देतो तुला बघून घेतो, अशी धमकी दिली.

सध्या महाराष्ट्रात पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असून त्यांना बातमी दिल्यानंतर जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्यामुळे पत्रकारांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे धमकी देणाऱ्या राठोड विरोधात पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी निवेदन देतांना यावेळी पत्रकार मंगेश यादव, विनोद भोईर, रवींद्रनाथ ओव्हाळ, गौसखान पठाण, एडव्होकेट काशिनाथ ठाकूर, भगवान शिंदे, निशांत पवार, एडव्होकेट सुशील गायकवाड, खलील सुर्वे, फिरोज पिंजारी, प्रशांत हिंगणे, निकेश पोकळे, शरद निकुंभ, निलेश धारीया, राजेंद्र मेहता, संदेश उतेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com