'डॉक्टर फॉर यु' संस्थेकडून शाळकरी मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप

अमित गवळे
मंगळवार, 27 मार्च 2018

पाली - ग्रामीण भागातील महिलांना आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात यावे असे शासनाच्या वतीने नुकतेच जाहीर केले आहे. या निर्णयात सामाजिक संस्थांचा सुद्धा सहभाग असावा म्हणून डॉ. रविकांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी आरोग्य या दृष्टिकोनातून काम करीत असलेल्या "डॉक्टर फॉर यु"  संस्थेमार्फत जांभूळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिरातील दोनशे मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

मासिक पाळीच्यावेळी शाळांमधल्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहत असल्याचे एका सर्वेक्षणानंतर समोर आले आहे. तसेच मासिक पाळीच्यावेळी योग्य ती स्वच्छता न बाळगल्यामुळे महिला व मुलींना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर तोडगा म्हणून 'डॉक्टर फॉर यु' या संस्थेने सॅनेटरी नॅपकिनचे वाटप केले.

मूली व महिलांना आरोग्याच्या समस्या येऊ नयेत यासाठी सॅनेटरी नॅपकिन हे आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे आणि ते वापरणे कसे गरजेचे आहे या विषयावर डॉ. संपदा कुलकर्णी व पंचायत समिती सुधागडच्या माजी सभापती भारती शेळके यांनी मुलींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला 'डॉक्टर फॉर यु' संस्थेचे कार्यक्रम अधिकारी अश्वेंद्र कुमार, महिला कर्मचारी व शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या.

Web Title: pali konkan doctor for you students sanitary napkins