शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तसांचे वाटप 

अमित गवळे 
मंगळवार, 27 मार्च 2018

पाली - सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ ठाणे यांच्या पुढाकाराने व टाटा कॅपीटलच्या सहकार्याने जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे शारदा विद्यामंदीर पेडली शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. 

ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांचा शैक्षणिक उत्कर्ष साधण्याच्या दृष्टीकोणातून हा सेवाभावी उपक्रम राबविला जात असल्याचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी संस्थेने दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करुन शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन घाडगे यांनी केले. याआधी शारदा विद्यामंदीर पेडली शाळेला विविध विषयांची पुस्तके सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघाने दिली आहेत. यावेळी टाटा कॅपिटलचे कंसल्टंट प्रकाश महाडीक यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनाचे महत्व विषद केले. विद्यार्थ्यांनी वाचनाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. वाचनाने मन तर व्यायामाने शरिर सदृढ होते. विद्यार्थ्यांनी परिक्षा म्हणजे केवळ पेपर सोडविणे असे न समजता त्या प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करावे. तर जागृत्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक जे.बी.गोळे म्हणाले की 2004 पासून शासनाने शाळा व क्रिडाविकासाठी आवश्यक असलेले अनुदान बंद केले आहे. परंतू सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपीटल संघाच्या पुढाकाराने शैक्षणिक चळवळ गतीमान होत आहे.  यापुढेही येथील शाळांतून परिवर्तनशिल व वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे विद्यार्थी निर्माण होतील असा विश्वास गोळे यांनी व्यक्त केला. 

या शैक्षणिक विकास उपक्रमाद्वारे सुधागडातील 600 विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 
    
यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, टाटा कॅपीटलचे कंसल्टंट प्रकाश महाडीक, जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक जे.बी.गोळे, विश्वास कोरडे, शिक्षण समिती प्रमुख वसंत लहाने, अविकांत साळुंके, राजेश गोळे, विठ्ठल खेरटकर, विश्वास गोफन, शाळेचे मुख्याध्यापक के.आर.हेमाडे, बळीराम निंबाळकर, दामोदर ठाकूर, अजय जाधव, बबन चव्हाण, अंकूश कोकाटे, रविंद्र सांगळे आदिंसह मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दामोदर ठाकूर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक के.आर.हेमाडे यांनी केले. 

Web Title: pali konkan school students school bags