pali
pali

पाली नगरपंचायतीच्या मार्गातील विघ्न सरले...

पाली : अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होण्याची प्रकीया मागील दोन वर्षापासून लालफितीत अडकली होती. मात्र पाली नगरपंचायत व्हावी यासाठी पालीतील काही नागरीकांनी उच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यासंदर्भात नुकताच उच्चन्यायालयाने निकाल जाहीर करुन आगामी चार महिन्याच्या आत पाली नगरपंचायत प्रस्तापीत करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनास दिले आहेत. त्यामुळे पाली नगरपंचायत होण्याच्या मार्गातील विघ्न दूर झाले आहेत.

यादसंर्भात सविस्तर माहिती अशी की शासन अधिसूचना नगर विकास, क्र. एमयुपी- २०१४/प्र.क्र. २०६/नवि- १९ दि. २६ जून, २०१५ अन्वये महाराष्ट्र शासनानमार्फत रायगड जिल्ह्यातील पालीसह अन्य सहा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचातीत होण्याची प्रक्रीया झाली होती. मात्र तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पाली ग्रामपंचायत राहावी यासाठी उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच दरम्यानच्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या प्रक्रीयेत नगरपंचायतीची जाहीरात प्रसारमाध्यमात प्रसिध्द न झाल्याच्या कारणाने नगरपंचायत प्रस्तापित होउ शकली नव्हती. त्यामुळे पाली ग्रामपंचायत जैसे थे ! राहिली. जुलै 2018 मध्ये ग्रामपंचायतीचा ५ वर्षाचा कार्यकाळ (मुदत) संपल्याने पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची अधिसुचना जाहीर झाली. मात्र यावेळी सर्व राजकीय पक्ष, नेते व नागरीकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत नगरपंचायत होण्याची मागणी केली. यावेळी पाली नगरपंचायत व्हावी यासाठी पालीतील पराग मेहता, गजानन शिंदे, अभिजीत चांदोरकर, सुधीर साखरले, संजोग शेठ व आशिक मनियार यांनी सर्व कागदपत्रासह उच्चन्यायालयात महाराष्ट्र शासनाविरोधात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या निकालास थोडा अवधी गेला. २६ सप्टेंबर २०१८ रोजी पाली ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला. तर अपक्ष उमेदवारांनी ही निवडणुक लढवली. परिणामी पाली ग्रामपंचायत प्रस्तापीत झाली. मात्र नुकताच उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत करण्याचा निर्णय दिला व अागामी चार महिन्यात सर्व प्रक्रिया पुर्ण करुन पाली नगरपंचायत करावी असा अादेश शासनाला दिला आहे.

पाली नगरपंचायत होणेकामी आवश्यक प्रक्रीया करणेबाबातचे आदेश उच्च न्यायालया मार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी रायगड यांच्यामार्फत आलेल्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.
- बि.एन. निंबाळकर, तहसिलदार, पाली- सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com