Pali News : वर्षभराचे सर्व मानधन प्रणाली शेळके यांनी 80 दिव्यांग व्यक्तींना सुपूर्द करून दिली नूतन वर्षाची भेट

पाली नगराध्यक्षा प्रणाली सुरज शेळके यांचे विधायक कार्य
pali nagarpanchyat mayor pranali shelake
pali nagarpanchyat mayor pranali shelakesakal

पाली - पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रणाली सुरज शेळके यांच्या कार्यकाळास मागील महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पूर्ण वर्षभरात मिळालेले सर्व मानधन प्रणाली शेळके यांनी बुधवारी (ता.10) शहरातील तब्बल 80 दिव्यांग व्यक्तींना समप्रमाणात सुपूर्द करून त्यांना नवीन वर्षाची अनोखी भेट देऊन नवा आदर्श ठेवला आहे.

प्रणाली शेळके यांनी नगराध्यक्षा झाल्यावर दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सहकार्य करायचे असे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी हा उपक्रम राबविला. पालीतील लिमये सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

आपल्या स्वतःच्या मेहनतीचे मानधन गरजूंना देण्यासाठी पुढाकार घेऊन ते कृतीत उतरविण्याचे काम नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांनी केले आहे.

या कार्यक्रमास शेकापचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, पाली सुधागड तहसिलदार उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व तालुका समन्वय समिती अध्यक्ष अनुपम कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, सुएसो उपाध्यक्ष रविंद्र लिमये, तालुका समन्वय समिती सदस्य सूरज शेळके, पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूनकर, शैलेश सोनकर, पाली नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती सुधीर भालेराव, नगरसेवक गणेश सावंत व सुलतान बेनसेकर, नगरसेविका कल्याणी दपके, मधुरा वरंडे, व प्रतिक्षा पालांडे यांच्यासह हेमंत सिलिमकर, मोरेश्वर कांबळे, कपिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बल्लाळेश्वर पेट्रोल पंपचे मालक प्रविण खाडे, निशिकांत पाटील, विकास जाधव, सुबोध पालांडे, शशिकांत दंत, विठ्ठल दळवी, नितीन जाधव, विकास जाधव, राहुल ठोंबरे, मंगेश ठोंबरे तसेच पाली शहरातील दिव्यांग व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप काटकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com