सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: लष्करात जाण्यासाठी बापूसाहेबांचा संघर्ष l Sindhudurg | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: लष्करात जाण्यासाठी बापूसाहेबांचा संघर्ष

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: लष्करात जाण्यासाठी बापूसाहेबांचा संघर्ष

श्रीमंत पंचम खेमराज (Pancham Khemraj)उर्फ बापूसाहेब यांचे इंग्लंडमध्ये (England) शिक्षण सुरू असतानाच जगावर पहिल्या महायुध्दाचे संकट घोंगावू लागले. क्षत्रिय बाण्याच्या बापूसाहेबांना लढाईवर जाण्याची इच्छा स्वस्त बसू देईना; मात्र सावंतवाडी (Savantwadi) संस्थानचे भावी राजे असलेल्या बापूसाहेबांवर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी इतक्या कमी वयात युद्धावर जाणे सोपे नव्हते. बापूसाहेब मात्र युद्धावर जाण्यासाठी हट्टाला पेटले. यासाठी त्यांनी अनेक अडचणी पार करत लष्करी शिक्षण घेतले.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला

श्रीराम सावंत अर्थात रावसाहेबांच्या निधनानंतर बापूसाहेब महाराजांकडे सावंतवाडीचे भावी राजे म्हणून अधिक ठळकपणे पाहिले जावू लागले. बापूसाहेब मात्र शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे घेण्याकडे लक्ष्य केंद्रीत करत होते. याचदरम्यान जगात पहिल्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले. बापूसाहेबांच्या आयुष्यात हे एक मोठे वळण होते. २८ जुलै १९१४ला प्रत्यक्ष सुरू झालेले हे महायुद्ध दीर्घकाळ चालेल असे संकेत मिळू लागले होते. इंग्लंड अर्थातच याच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे बापूसाहेबांना या जागतिक घडामोडी खूप जवळून समजत होत्या. त्यांच्यात असलेले क्षत्रियाचे रक्त स्वस्त बसू देईना. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मॅलव्हर्न येथील महाविद्यालयाच्या लष्करी शिक्षण देणाऱ्या शाखेत लगेचच नाव नोंदवले. तेथे वर्षभराचे शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: बापूसाहेब शिक्षणासाठी गेले सातासमुद्रापार

स्वबांधवांच्या फलटणीत झाली नियुक्ती

असे सांगितले जाते की, बापूसाहेबांची आधी घोडदळात नेमणूक झाली होती. यात मराठा फलटणीतील कोणी नव्हते. त्यामुळे बापूसाहेबांनी मराठा लाईट इन्फंट्रीत नियुक्ती करण्याची इच्छा बोलून दाखवली. स्व बांधवांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी त्यांनी हे पावूल उचलले. वास्तविक सैन्यात इच्छेला फारस महत्त्व दिले जात नाही. आदेश सर्वोच्च मानला जातो. त्यामुळे शिस्तीचे भोक्ते असलेले बापूसाहेब स्वतःहून अशी इच्छा व्यक्त करणार नाहीत असेही काहींचे मत आहे. त्यामुळे याबाबत नेमके सांगणे कठीण आहे, पण त्यांची नियुक्ती स्व बांधवांच्या फलटणीत झाली, हे मात्र वास्तव आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top