esakal | Konkan Breaking - मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला मोठी गळती
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Breaking - मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला मोठी गळती

Konkan Breaking - मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला मोठी गळती

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील (mandangad) पणदेरी धरणाला (panderi dam) मोठी गळती लागली आहे. ही घटना समजताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धरणातून निघालेल्या कालव्याच्या भिंतीजवळ गळती आहे. तिथून मोठ्या प्रमाणात मुख्य भिंतीतून पाणी झिरपत आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित (migrate) करण्यासाठी धरण परिसरात मंडणगड तहसीलदार आणि पोलिस हजर झाले आहेत. (ratnagiri district)

हेही वाचा: लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

या परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. गळती ठिकाणी पिचिंग करण्याचे काम सुरू असून पाणी गळती होणाऱ्या ठिकाणी पोत्यातून माती भरून भराव केला जात आहे. तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा दाब कमी करण्यासाठी सांडव्याची उंची तोडून कमी करण्याचे काम सुरू आहे. नागरिक स्थलांतरास किती प्रतिसाद देतात याचा अंदाज सध्या प्रशासनाकडून घेणे चालू आहे. या धरणाशेजारी सुमारे पंधरा गावे असून धरणाच्या पायथ्याशी जवळपास सहा वाड्या आहेत. प्रशासन गळतीचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेईल, मात्र असे असले तरी खबरदारी म्हणून येथील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

loading image