सवय जडली ; अभ्यास कमी, अन्‌ मोबाईल गेम जादा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

शासनाने गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.

राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धती अवलंबिली गेली. यातून मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. त्यातून मुलांना अभ्यासाबरोबर विविध गेम खेळण्याची आयती संधी चालून आली. त्यामुळे मुले अभ्यास कमी, अन्‌ मोबाईल गेम जादा खेळतानाचे चित्र दिसत आहे.

शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून शासनाने गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. ती पुन्हा सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्‍चितता आहे. या कालावधीमध्ये अभ्यासामध्ये खंड पडू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबिली आहे. ज्या ठिकाणी मोबाईल रेंज आहे, त्या ठिकाणी घरोघरी वा मोबाईल रेंज मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी हातामध्ये मोबाईल घेऊन अभ्यास करतानाचे चित्र दिसत आहे. या कालावधीमध्ये अभ्यासाच्या नावाखाली मुले कमालीची मोबाईलच्या आधिन झाली आहेत.

हेही वाचा- मेर्वीत त्याची  पुन्हा दहशत ; चतुराईने वन खाते हैराण

मुले अभ्यासाबरोबरच मोबाईल गेम खेळत बसतात. काही वेळा क्‍लास सुरू असतानाही मुले अभ्यासापेक्षा गेम जास्त खेळतानाचे चित्र आहे. शिक्षणामध्ये खंड पडू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती हा योग्य पर्याय असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काही प्रतिकूल परिणाम होण्याची भीती पालकांसह तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये एकटक मोबाईलकडे पाहणे, मान खाली घालून अभ्यास करणे आदींमुळे भविष्यात मुलांना मणक्‍याचा, पाठीचा व डोळ्यांना त्रास होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा-सर्व्हैक्षणासाठी गृहभेटींवर भर, स्पर्धात्मक उपक्रमही, पहिला टप्पा झाला सुरू -

घराच्या अंगणात मुले मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करतात. मात्र, खरोखरच ती अभ्यास करतात की मोबाईल गेम खेळतात, हे प्रत्येक वेळा पाहिले जात नाही. बऱ्याच वेळा पालकांची नजर चुकवून गेम खेळताना ती दिसतात. मग त्यांना अभ्यासासाठी मोबाईल द्यायचा की नाही, असा प्रश्‍न पडतो. 
-रोशन शिर्के, पालक

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents disterbonline learning methods but child attraction mobile gaming