कणकवली मारहाण प्रकरणः पारकर-नलावडे गटाच्या 20 जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कणकवली - भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मारहाण आणि गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी दोन्ही गटातील 20 संशयित आरोपींना पोलिसांनी आज अटक करून न्यायालयात हजर केले.

कणकवली - भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मारहाण आणि गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी दोन्ही गटातील 20 संशयित आरोपींना पोलिसांनी आज अटक करून न्यायालयात हजर केले.

नगराध्यक्ष समीर नलावडेसह 13 आणि आदित्य सापळेसह सात जणांचा यात समावेश असून या सर्वाना प्रत्येकी साडेसात हजाराच्या जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कणकवली महाविद्यालयाच्या आवारात युवा कार्यकर्त्याना भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण झाली होती. याचा राग मनात धरून स्वाभिमानच्या नगराध्यक्ष नलावडे आणि नगरसेवकांनी संदेश पारकर यांच्या घरासमोर मोटरसायकलची तोडफोड केली होती. याप्रकरणी परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे नोंदविण्यात आले होते.

Web Title: Parkar Nalavade quarrel 20 peoples arrested